Posts

Showing posts from May, 2016

कृष्ण आणि मी - भाग १

Image
कृष्ण आणि मी - प्रस्तावना "कृष्ण" हा शब्द वाचला किवा ऐकला तर डोळ्यापुढे काय ऊभ राहत? ऊभ राहत ते माहाभारत, कंसाचा वध, अर्जुनाला सांगितलेली भगवतगीता, द्रौपदीची झालेली घोर विटंबना, प्रेमाने ओतप्रेत भरलेली राधा, आणि बरच काही. श्रीकृष्णचा जिवनपट जर उकलून पाहीला तर एकच प्रश्न पडतो "खरच तो होता तरी कोण?". आणि त्याच्या जिवनपटातुन त्याच उत्तर कदाचित अस देता येईल. देवकीनंदन.... एक पुत्र, बालगोपाल.... एक सर्वप्रिय कान्हा.... एक बंधु गोविंद.... एक गवळी केशव.... एक तारणहार मुरली.... बासरीच्या संगतीने मन मोहुन टाकणारा राधावल्लभ.... एक प्रियकर कृष्ण.... एक शत्रु मुकुंद.... एक शिष्य माधव.... एक मार्गदर्शक स्वामी.... एक पती श्याम.... एक सखा तात.... एक पिता आणि श्रीकृष्ण.... माहाभारताच युद्ध आपल्या बोटावर नाचवणारा एक कुशल द्युतपटाकार. अशी कोणती भुमिका जी त्याने बजावली नाही. त्याने आपल्या जिवनात सगळ्याच प्रकारच्या भुमिका पार पाडल्या. तो कधी कोणाचा मित्र बनुन आला, कधी कोणाचा बंधु बनुन, तर कधी कोणाचा गुरु. मला असं वाटत तो आजही प्रत्येकाच्या मनात तसाच व