गिरिधर माझा - प्रस्तावना


प्रेम....कसलीही अपेक्षा न ठेवणार आदरयुक्त आकर्षण. प्रेम....अशक्यातला शक्य मिळवण्याची कला.

प्रेम....जीवाला लागलेली मिलनाची ओढ. प्रेम....समाधानानी गाठलेला शिखरावरचा सर्वोच्च बिंदू. प्रेम....कधीही न कळणार स्वरूप, कारण प्रेम....कधी ते मायेन फिरवलेला डोक्यावरचा हात, तर कधी लाजुन चुर होऊन खाली केलेली नजर. प्रेम....या जीवनातला सर्वात गोड अनुभव. तरीही, प्रेम....प्रत्येकाच्या जीवनातला एक अनुत्तरीत प्रश्न.

प्रेमावर थोड लिहण्याची ईच्छा झाली, म्हणुन अजुन त्याबद्दल लिहतोय. कसलीही अपेक्षा न ठेवता केलेल प्रेम सगळ्यात शुध्द असत, पवित्र असत. आणि अश्या निरपेक्ष  प्रेमाच फळ हे मिळतच मिळत. आता हेच बघा ना, आई आपल्या बाळावर जीव ओतुन प्रेम करते, त्याचा सांभाळ करते. पण या बदल्यात तिला बाळाकडुन काय मिळत? अस काय आहे जे काहीही न जाणणाऱ्या त्या बाळाकडुन तिला मिळत? तिला मिळतो तो त्या बाळाचा विश्वास. त्या निष्पाप जीवाचा विश्वास असतो, तो तिच्या सांभाळुन घेण्यावर. आणि तोही तितकाच शुध्द, तितकाच पवित्र. म्हणुनच खऱ्या प्रेमात कसलीही अपेक्षा नसतेच. तिथे अपेक्षा, मोह, सुंदरता, मान, अपमान, पत, प्रतिष्ठा यांना कुठेच जागा नसते.

एकीकडे प्रेम तर दुसरीकडे स्त्री. हो स्त्री. स्त्री म्हणजे, वात्सल्याची जिवंत मुर्ती. विधात्याचा तेजशक्तीचा, अखंड निर्माणशील वात्सल्याचा, घराघरात वावरणारा अंश म्हणजे स्त्री. या स्त्री च्या अनेक भुमिका. कधी जन्मल्यावर आई आणि सर्वप्रथम गुरू, तर कधी सगळ्यात लाडकी मुलगी. कधी भांडकुदळ बहीण, तर कधी प्रत्येक वळणावर भेद न करता मदत करणारी मैत्रिण. कधी आदरणीय वहिनी, तर कधी जन्म जन्मांतरीला साथ देणारी अर्धांगिनी. तिची कोणतीही भुमिका घेतली, तरी प्रत्येक भुमिकेत ती प्रेमाने ओतप्रेत भरलेलीच आणि सदासर्वदा वंदनीय.

आजही आपण इतिहास जर उखरून काढला, तर कितीतरी प्रेमकाहाण्या अलगद आपल्या हातात येतीलच. काही मन प्रसन्न करणाऱ्या, तर काही काळीज विदीर्ण करणाऱ्या. अस म्हणतात, या जीवनात तीनच गोष्टी जीवाला त्याच्या पुर्णत्वाला पोहोचवतात. एक म्हणजे ज्ञान, दुसर म्हणजे भक्ती आणि तिसर म्हणजे....प्रेम. पण या तिनही गोष्टी मला गणितातल्या त्रिकोणाप्रमाणे वाटतात. तिनही बाजु, अगदी सारख्या, पुर्णपणे एकजीव. एक गोष्ट जरी उचलली तर बाकीच्या दोन आपोआपच तुमच्या हातात येतीलच.

"गिरिधर माझा" ही स्वरांनी ओतप्रेत भरलेली प्रेमकाहाणी आहे एका स्त्रीची. एक स्त्री, जिनं आपल संपुर्ण जीवन आपल्या पतिच्या प्रेमासाठी वाहल, आणि एक आदर्श प्रेमाच उदाहरण जगासमोर ठेवल. वाटेत आलेल्या सगळ्या संकटावर तिने मात केली. सगळा अपमान हसत हसत सहन केला. आणि सरतेशेवटी तिच ज्ञान, भक्ती आणि प्रेमाच्या माध्यमातून जगातल्या सर्वोच्च पदाला ती पोहोचली. पण ही स्त्री कोण? आणि ती कशी त्या पदाला पोहोचली? या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला "गिरीधर माझा - भाग १" मध्ये नक्कीच मिळेल. तोपर्यंत, तुम्हीपण विश्वास ठेवा आणि जीव ओतून प्रेम करा....

गिरीधर माझा
१८-मार्च-२०१६

Comments

Post a Comment

Popular posts from this blog