शिवमय  मी (भाग - १) - प्रस्तावना

प्रस्तावना … 
शिवमय मी ही एका साधकाची कथा आहे. एक साधक, जो तपस्येच्या माध्यमातुन भगवान शंकराला प्रसन्न
करायला निघतो. उग्र तपस्या करण्याच्या नादात स्वतःलच्या प्राणालाही मुकतो. पण जेव्हा त्याची तपस्या पुर्ण होते, तेव्हा शिवाचे दर्शन केल्यानंतर तपस्येचा मुळ उद्देष्यच विसरतो, आणि स्वतःलाच तो शिवामधे हरवून बसतो. शिवमय होतो.

अशी कोणती मोहीनी शिवाच्या दर्शनात आहे, ज्याने महान योगी, तपस्वीसुध्दा शिवभक्तीच्या प्रेमात पडतात. अशी कुठली शक्ती शिवलिंग म्हणणाऱ्या  त्या दगडात आहे, ज्याची पुजा योगी-माहायोगी श्रध्देन करतात. या सगळ्या गोष्टींचा साक्क्षातकार त्या साधकाला होतो.

पुर्ण अंगावर प्रेतांचे भस्म फासलेला शिव, गळ्यामधे विषारी नाग धारण करणारा शिव, वनोवनी भटकणारा अघोरी शिव, गांजाचे सेवन करणारा शिव, स्मशानालाच स्वतःचे निवास्थान माननारा शिव, तिन्ही लोंकाची ज्याला काही पर्वा नाही आणि ज्याला आपल्या ध्यान धारनेतच सगळे स्वारस्य आहे असा शिव. तरीही "सत्यम शिवम सुंदरम" म्हणजेच, सत्य हाच शिव आणि सगळ्यामधे सुदंर हाच शिव कसा या सगळ्या गोष्टींचा उलघडा करणारी ही कथा, एका साधकाच्याच दृष्टीतून.

Comments

  1. Shiwmay me...Eagerly waiting for the story..

    ReplyDelete
  2. Congrats and all the best.. Awaiting for more Kirpan. Greetings !!!

    ReplyDelete
  3. All d best for next too.. !!Good job!

    ReplyDelete
  4. प्रस्तावना तर फाडू होती आता मूळ वाचतो

    ReplyDelete
  5. प्रस्तावना तर फाडू होती आता मूळ वाचतो

    ReplyDelete
  6. Waiting for next part boss. ..really nice

    ReplyDelete
  7. Thanks guys... Story published, visit home page. Hope you like story also.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog